आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:महाटीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता, 11,970 विद्यार्थ्यांची नोंदणी

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाटीईटी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी २५ आॅगस्ट ही शेवटची मुदत आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमुळे महाटीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत शक्यता वर्तवण्यात आली असून लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर होऊ शकेल. परीक्षा परिषदेतर्फे याबाबत संकेतस्थळावर सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी यासाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षेचे (महाटीईटी) वेळापत्रक २९ जुलै रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ही परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी ही परीक्षा घेतली जाईल. गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातील विद्यार्थी या परीक्षेची प्रतीक्षा करत होते. कोरोनाचा संसर्ग कमी होत चालल्याने अखेर राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. मात्र, याच दिवशी लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेतली जाणार असल्याने एकाच दिवशी दोन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.

प्रवेश अर्जासाठी उद्या शेवटची संधी
३ ते २५ ऑगस्ट : ऑलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी.
२५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर : प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढणे.
१० ऑक्टोबर (पेपर १) : सकाळी १०.३० ते दु. १ वाजेपर्यंत.
१० ऑक्टोबर (पेपर २) : दुपारी २ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.

बातम्या आणखी आहेत...