आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची गळफास लावून आत्महत्या!:पती, सासूने खून केल्याचा माहेरच्या नातेवाईकांचा आरोप; जिल्हा रुग्णालयात तणाव

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुर गावात विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवार (ता. 7) सकाळी उघडकीस आला. सोनाली अभिषेक देवकर (वय 22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती आणि सासूने तिचा गळा आवळून खुन केल्याचा आरोप केला जात आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नांदुर येथील राहणारा अभिषेक देवकर याचे 3 वर्षापुर्वी सोनाली सोबत लग्न झाले. या दाम्पत्याला दीड वर्षाची मुलगी आहे. सकाळी तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, हि बाब कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यानंतर सोनाली यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला. मृत सोनालीच्या गळ्यावर रक्ताचे डाग आणि पायावर जखमा असल्याने नातेवाईकांना संशय आला.

पती आणि सासूवर आरोप

पती आणि सासूने गळा आवळून सोनालीचा खून केल्याचा आरोप संतप्त माहेरच्या नातेवाईकांना केला. आडगाव पोलिस ठाण्यात तूर्तास याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ निरिक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

चार दिवसांपुर्वी सुरतहून आली होती सोनाली

पती आणि सासू सोनालीस माहेरुन एक लाख रुपये आणावे म्हणून शारीरीक मानसिक छळ करीत असल्याचा आरोप होत असून यामुळेच सोनाली सुरत येथे आईकडे गेली होती. चार दिवसांपुर्वी सासू आणि पतीने तिला त्रास देणार नाही अशी हमी देत नाशिकला आणले होते.

हा आहे आरोप

सोनालीच्या पती आणि सासूने तिला बेदम मारहाण करत तिचा खुन केला, नंतर गळफास घेतल्याचा बनाव केला असा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला असून जोपर्यंत पती सासूवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वातावरण काही काळ तणावाचे होते.

बातम्या आणखी आहेत...