आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून मुदतीत कामे संपवा:विक्रीकर न्यायाधिकरण सदस्य सुमेरकुमार कालेंचे कर सल्लागारांना मार्गदर्शन

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही क्षेत्रामध्ये ठराविक वेळेनंतर बदल होत असतात व हे बदल सद्य परिस्थिती नुसार आवश्यकही असतात. जीएसटी कायदा आल्यापासून तर तो सर्वांना समजून घेण्यापर्यंत त्यात सातत्याने बदल होत गेले त्यामुळे आपल्याला वस्तू व सेवा कर कायदा समजून घेणे व त्याचा नियमित अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे तरच आपण यशस्वी कर सल्लागार होऊ शकतो असे मार्गदर्शन महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाचे सदस्य सुमेर कुमार काले यांनी केले.

नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, गुड्स अ‍ॅड सर्विस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशन यांच्यावतीने आयोजित,"कर व्यवसायिकांसाठी युक्तीच्या चार गोष्टी" या वेबिनारमध्ये काले मार्गदर्शन करीत हाेते.

कर सल्लागार म्हणून काम करत असताना कोणते काम केले पाहिजे व ते कधी केले पाहिजे याचे काटेकोरपणे नियोजन केले पाहिजे,

विविध कामे करत असताना प्रत्येक कामाची मुदत लक्षात घेऊन त्यानुसार कामाचे नियोजन करा व वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे त्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा. कर सल्लागारांचे जीवनमान अतिशय धकाधकीचे झालेले असल्याकडे काले यांनी लक्ष वेधले. कायद्यांमध्ये होत असलेले वारंवार बदल हे समजून घेऊन आपल्या क्लाइंटला योग्य पद्धतीने समजावून सांगून वेळेत काम पूर्ण करावे लागत आहे. वस्तू व सेवा कर कायद्याचे अद्ययावत माहिती असणे तसेच त्याचा नियमित अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी आपण हाताळत असताना आपली दैनंदिन जीवनशैली व ऑफिसचे कामकाज यामध्ये समतोल साधता आला पाहिजे. प्रत्येक काम हे आनंदाने व उत्साहाने करता आले पाहिजे, मुदतीत काम संपवायच्या मागे आपले वैयक्तिक आयुष्य देखील जपता आले पाहिजे, शक्य होईल तेवढेच काम करण्याचा प्रयत्न करा व आपले आरोग्य ही जपा असा सल्ला देतांनाच या सर्व गोष्टींचे व्यवस्थित रित्या नियोजन करता आले तरच तुम्ही यशस्वी कर सल्लागार होऊ शकतात व आपले काम उत्तम पद्धतीने हाताळू शकतात असे वरिष्ठ कर सल्लागार अनिल चव्हाण यांनी त्यांच्या मार्गदर्शनात स्पष्ट केले. शेवटच्या सत्रात किशोर लुल्ला यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन नितीन डाेंगरे यांनी तर आभार प्रदर्शन अ‍ॅड.प्रदिप क्षत्रिय यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...