आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकेतस्थळ:दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी करा 30 पर्यंत अर्ज ; ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिल्याची माहिती

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षेत्तर (पोस्ट मॅट्रिक) व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येतात. या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी शाळा व महाविद्यालयीन पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिली. शिष्यवृत्तीसाठी १५ नोव्हेंबर २०२२ तसेच शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत https://scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

बातम्या आणखी आहेत...