आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथर्डी शिवारातील प्रस्तावित टाकाऊ बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्प मखमलाबाद शिवारातील सर्व्हे क्रमांक ३२३/२/२ मधील २१८०० चौरस मीटर अर्थात सुमारे साडेपाच एकर क्षेत्रावर हलविण्यास भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी विराेध सुरू केल्यानंतर प्रशासन बॅकफूटवर आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविण्याचे आदेश पालिका आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्याचे समजते.
केंद्राच्या स्वच्छ शहर स्पर्धेत सलग दाेन वर्षे त्यामुळे फटका बसल्यानंतर महापालिकेने टाकाऊ बांधकाम साहित्याच्या विल्हेवाटीचा प्रकल्प पाथर्डी खतप्रकल्पाशेजारी उभारण्याचा निर्णय घेतला हाेता मात्र, ही जागा उपलब्ध न झाल्यामुळे मखमलाबाद शिवारातील सर्व्हे क्रमांक ३२३/२/२ मधील क्षेत्राची निवड करून तसा महासभेने २०२२ मध्ये ठरावही केला आहे. त्यानुसार तत्कालीन प्रशासक रमेश पवार यांच्या स्वाक्षरीने कारवाई सुरू झाल्यानंतर त्यास नागरिकांचा विराेध सुरू झाला.
माजी महापौर भानसी, उपमहापौर भिकूबाई बागूल, माजी गटनेता अरुण पवार, माजी नगरसेविका सुनीता पिंगळे तसेच प्रमाेद पालवे यांनी आयुक्तांची भेट घेत संबंधित प्रकल्प येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे आता हा प्रकल्प पूर्ववत पाथर्डी येथेच हलविण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यासाठी महासभा व स्थायी समितीचा ठराव रद्द करण्याची तयारी सुरू झाली आहे. हा ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठवता येईल का याची चाचपणी केली जात आहे.
खत प्रकल्पाच्या जागेतच बांधकाम साहित्य विल्हेवाट
मखमलाबाद येथे बांधकाम साहित्य विल्हेवाटीचा प्रकल्प येऊ देणार नाही. मात्र, हा प्रकल्प शहरात करणे अत्यंत गरजेचे आहे. पंतप्रधान माेदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात नाशिकला पुढे आणण्यासाठी प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाला पाथर्डी येथेच खतप्रकल्पात जागा देण्यासाठी आयुक्तांनी तयारी दाखवली आहे. - गणेश गिते, माजी स्थायी समिती, सभापती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.