आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत डेंग्यूचे 157 नवीन रूग्ण:कागदाेपत्री पेस्ट कंट्राेलमुळे मलेरिया विभाग वादात; वादग्रस्त ठेकेदारांना पात्र करण्याची धडपड सुरूच

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक विषयात हात कसे ओले करता येईल या मनाेवृत्तीने ग्रासलेल्या पालिकेतील काही विभागाच्या करामतीची झळ नाशिककरांना साेसावी लागत असून मलेरिया विभागाच्या दुर्लक्षामुळे कागदाेपत्री पेस्ट कंट्राेल हाेत असल्यामुळे ऐन दिवाळी कालावधीत डेंग्युचे रूग्ण वाढल्याचे उघड झाले आहे.

ऑक्टाेंबर महिन्यात डेंग्युचे 157 नवीन रूग्ण आढळले असून हे रूग्ण रेकाॅर्डवरील आहेत. प्रत्यक्षात डेंग्युचे लक्षणे असलेले व खासगी रूग्णालयांनी न कळवलेल्या रूग्णांची संख्या माेठी असल्याचे बाेलले जाते. दरम्यान, पेस्ट कंट्राेलच्या 31 काेटीच्या ठेक्यात वादग्रस्त ठेेकेदारांना पात्र करण्यासाठी धडपड सुरूच असून तांत्रीक कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया जवळपास पंधरापेक्षा अधिक दिवस हाेवूनही प्रलंबित आहे.

स्मार्ट , स्वच्छ व सुंदर अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात आराेग्याची दैना उडाली आहे. यंदा पावसाळा लांबल्यामुळे साथजन्य आजारांनी चांगलाच धुमाकूळ घातला. लांबलेला पाऊस लक्षात घेत प्रामाणीकपणे शहरात पेस्ट कंट्राेल करणे गरजेचे हाेते मात्र एका अधिकाऱ्याची ठेकेदाराशी असलेली कथित भागीदारीचा फटका संपुर्ण शहराला बसल्याचे चित्र आहे. शहरात अनेक ठिकाणी ओषध व धुर फवारणी नियाेजीत वेळेत हाेत नसल्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया सारख्या आजारांनी डाेकेवर काढले. ऑगस्टपासून या आजाराशीसंबधित रूग्ण सातत्याने वाढतच गेले. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 99 रुग्ण असताना सप्टेंबरमध्ये त्यात वाढ होऊन 139 पर्यंत बाधितांचा आकडा गेला.

ऑक्टोबरमध्ये पाऊस उघडून लख्ख उन पडल्यामुळे पाण्याची डबकी नष्ट झाली. तसेच दिवाळीनिमित्त घराेघरी साफसफाई सुरू झाल्यामुळे रूग्ण घटण्याची अपेक्षा हाेती. प्रत्यक्षात, डेंग्यूचे तब्बल 157 नवे बाधित आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये १६ रुग्ण पहिल्या दोन दिवसात आढळले असल्यामुळे आरोग्य विभागाने सतर्क होणे गरजेचे झाले आहे.

चिकनगुनियाचे 28 ; तापाचे रूग्ण वाढले

डेंग्यू पाठोपाठ चिकुनगुनियाचे आतापर्यंत 28 रुग्ण आढळले आहे. मात्र दिलासादायक म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रादुर्भाव कमी आहे. दुसरीकडे, तापसदृश आजाराने शहरात थैमान घातले असून गेल्या महिनाभरात तापसदृश आजाराचे तब्बल 2735 रुग्णांनी पालिका रूग्णालयात उपचार घेतले आहेत. खासगी रुग्णालयातील तापसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जाते.

आयुक्त कधी लक्ष घालणार ?

पेस्ट कंट्राेलचा ठेका गेल्या अनेक वर्षाेपासून वादात असून यंदा आपल्याला ठेका मिळवून देण्यासाठी मालेगावमधील एका ‘दादा’ व्यक्तीने जाेर लावल्याचे दावे खासगीत करून वादग्रस्त ठेकेदार प्रशासनावर दबाव वाढवत असल्याची चर्चा आहे. भाजपाचा एका पदाधिकाऱ्यालाही संबधितांची ‘पालवी’ फुटली असून हे प्रकरण पक्षाच्या वरिष्ठांकडे गेले आहे. ही बाब लक्षात घेत आयुक्त डाॅ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निपक्षपातीपणे सर्व प्रक्रिया लवकरात लवकर अंतिम करून चुकीची कागदपत्रे सादर करणाऱ्यांना बाद करणे गरजेचे असल्याचा सुर व्यक्त हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...