आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव खटला:17 वा साक्षीदार फितूर, एटीएसने अपहरण केल्याचा कोर्टात आरोप, आरएसएस व संघ नेत्यांची नावे गोवण्यासाठी एटीएसने दबाव आणल्याचा दावा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील १७ वा साक्षीदार विशेष न्यायालयातील सुनावणीदरम्यान उलटला. महाराष्ट्र एटीएसने आपले अपहरण करून फरार आरोपी रामजी कलसंग्रा व संदीप डांगे यांच्याबाबत खोटी साक्ष देणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व संघ नेत्यांचे नाव गोवण्यासाठी एटीएसने दबाव आणल्याचा आरोप त्याने केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार एटीएसचे अधिकारी या वेळी उपस्थित नव्हते.

हा खटला मुंबईत एनआयएच्या विशेष कोर्टात सुरू आहे. आरोपी क्रमांक १-रामजी शिवसंग्रा व आरोपी क्रमांक २-संदीप डांगे २०११ पासून फरार आहेत. एनआयएने त्यांच्यासाठी प्रत्येकी १० लाखांच्या बक्षिसाची रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली आहे. गुरुवारी कोर्टात या आरोपींशी संबंधित साक्षीदाराची साक्ष होती. पुण्यातील साक्षीदार संघाशी संबंधित असून २००५ मध्ये इंदुरात कार्यक्रमासाठी गेले असता रामजीच्या घरी भोजन केल्याची, मात्र त्यानंतर न भेटल्याची साक्ष त्याने दिली. २००६ मध्ये डांग येथील शबरीमाला कुंभात दूरध्वनी कार्यालयाची जबाबदारी सांभाळत असल्याने अनेक स्वयंसेवकांप्रमाणे रामजीकडेही आपला संपर्क क्रमांक होता, मात्र ८ ऑगस्ट रोजी त्याने फोन केला तेव्हा आपण हिमाचल प्रदेशात असल्याची साक्ष दिली. रामजीचा इंदूरमध्ये इलेक्ट्रिकचा व्यवसाय होता हे त्याने मान्य केले, मात्र मालेगाव स्फोटाशी संबंधित आपल्याला काहीही माहिती नसल्याचे तो म्हणाला.

२२२ साक्षीदार, १७ फितूर
मालेगाव खटल्यात आतापर्यंत २२२ सरकारी साक्षीदारांपैकी १७ जणांनी आपला जबाब बदलला आहे. त्यामुळे त्यांना फितूर घोषित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...