आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मालेगाव कोरोना:10 हजार नागरिकांच्या टेस्ट, 79 बळी, 9026 निगेटिव्ह; अद्याप युद्ध सुरूच

शंकर वाघ | मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 नियम व्यावसायिकांना असले तरी नागरिक सोयीनेच मास्क लावतात

शहरात कोरोनाच्या प्रवेशाला शुक्रवारी (दि. १७) शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात १० हजार ४९ नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यात ११७४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यातील ७९ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. तरी उर्वरित ९४८ बधितांनी मात्र कोरोनावर मात केली आहे. सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी संपुष्टात आलेला नाही, त्यामुळे अद्याप युद्ध सुरूच आहे.

दि. ८ एप्रिल रोजी मालेगाव शहरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले. यातील एकाचा याच दिवशी चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. अशाप्रकारे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या कोरोनाचे पहिले पाऊल मालेगावात पडले. शहराची लोकसंख्या व घनता लक्षात घेता, स्थानिक आरोग्य यंत्रणा व राज्य शासनदेखील हादरले. मालेगावात कोरोनाने बस्तान बसवले तर मृत्यूदर वेगाने वाढण्याची भीतीदेखील व्यक्त केली गेली होती. मात्र, एप्रिल व मे या दोन महिन्यांचा अपवाद वगळता जूनमध्ये कोरोना रुग्णसंख्या घसरली. यात उपचार व नियोजनासाठी आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाची मेहनत असली तरी मालेगावकरांच्या इच्छाशक्तीचा हा चमत्कार आहे. प्रारंभीचा ५५ दिवसांचा काळ वगळता नागरिकांनी कोरोनाची भीती अक्षरशः झुगारून दिली आहे. दिवसभर काम, तीन वेळा पोटभर व वजनदार आहार, पूर्ण झोप, नि:संकोच वास्तव्य हीच आजच्या कोरोना संक्रमण काळातदेखील येथील मोठ्या लोकसंख्येची जीवनशैली झाली आहे.बाजारपेठा, रस्ते महिनाभरापासून अनलॉक आहेत. नियम व्यावसायिकांना असले तरी सामान्य नागरिक सोयीनेच मास्क लावतो. सुरक्षित अंतर राखले जात आहे पण मालेगावकर आता पूर्वीप्रमाणे पारंपरिक आपल्याच मस्तीतील जीवनशैलीत परतले आहेत.

या भागात गेले बळी

नयापुरा (८), इस्लामपुरा (२), मुस्लिमनगर (४), पवारवाडी (४), दरेगाव (२), निहालनगर (२), कुसुंबारोड (२), द्याने (३), हुडको कॉलनी (२), तर महेवीनगर, हजारखोली, श्रीरामनगर, जाफरनगर, समतानगर, कासीमनगर, समर्थ कॉलनी कॅम्प, टिळकनगर, दातारनगर, ज्ञानेश्वरनगर, हिंगलाजनगर, आझादनगर, गुलाब पार्क, अपना सुपर मार्केट, एकतानगर, सलीम मुन्शीनगर, उस्मानाबाद, डीके पान स्टॉलजवळ, जवाहरनगर, महालक्ष्मी कॉलनी, निहालनगर, निषादनगर, ६० फुटी रोड, खालिदनगर, नुमानीनगर, रमजानपुरा, नवनाथनगर, ज्योतीनगर, नूरबाग, आझमीनगर, आयेशानगर, मोहनबाबानगर, झाकीर हुसेननगर, मदिनाबाद, रसुलपुरा, इकबाल डाबी, जाफरनगर, अमन चौक, गोल्डननगर, गुलशने इब्राहिम प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे.

मालेगाव पॅटर्न किती खरा?

मालेगावात कोरोना नियंत्रणात आल्याने प्रत्येक घटक आपल्या पद्धतीने वर्णन करत त्याचे श्रेय घेत आहे. सध्या काढ्यांचा प्रसार अन‌् प्रचारदेखील शिगेला आहे. मात्र, हे काढे घेऊन कोरोनामुक्त झाल्याचा एकही रुग्ण समोर आलेला नाही. भीतीपोटी ब्रह्मराक्षस असलेल्या व बाधित नसलेल्या नागरिकांनी हे उपचार सुरू केले आहेत. यामुळे अनेकांना मूळव्याधीचा सामनाही करावा लागला आहे.