आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मल्लखांब, जिम्नॅस्टिक स्पर्धेने रंगत; सिडकाेतील वावरे महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

सिडको4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, नाशिक विभागीय क्रीडा समिती नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे महाविद्यालय सिडको, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन मल्लखांब, रोप मल्लखांब व जिम्नॅस्टिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मराठा समाज संस्थेचे संचालक ॲड. लक्ष्मणराव लांडगे, संचालक रमेश पिंगळे, क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. रसाळ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजेंद्र झनकर, प्रा. सीताराम निकम, प्रा. अशोक बोडके, प्रा. गोकुळ घुगे, डॉ.दिनेश कराड, स्पर्धा संयोजक डॉ.मीनाक्षी गवळी व प्रा.नारायण जाधव, डॉ. लहानू जाधव, डॉ.राजाराम कारे, सोपान जाधव, प्रा.धनंजय बर्वे, संपत दोडके, प्रा.मनीषा सोनवणे, प्रा.चेतन आव्हाड, प्रा.भीमराव शिरसाठ, प्रा. अजिंक्य उगले, अरुण पोकळे व विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक व मोठ्या संख्येने खेळाडू तसेच पंच पॅनल उपस्थित होते.

पंच पॅनलमध्ये यशवंत जाधव, राकेश केदार, साक्षी गर्गे, नितीन जोशी, राकेश केदारे, संदीप शिंदे, प्रबोधन डोणगावकर, रोहित वाघ, दीपेश वाघ, तेजस वाघ, प्रीतिश लेले, आकाश दाणी, तन्वी पटेल यांनी काम पाहिले. तर स्पर्धा यशस्वितेसाठी किरण जाधव, सुनील आहेर, हेमंत काळे, पूनम गोसावी, राहुल चौधरी, वैभव खंडागळे, व सर्व खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...