आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी वाऱ्यासह पाऊस:मनमाडला वादळी वाऱ्यासह दीड तासामध्ये 32 मिमी पाऊस, शाळेचे पत्रेही गेले उडून

मनमाड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व ग्रामीण भागात बुधवारी दुपारी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने सुमारे दीड तास धुवाधार बरसात केली. आज ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली मनमाडबरोबरच पानेवाडी, नागापूर, भालूर, हिसवळ आदी भागातील ४० खेड्यांमध्येही हा पाऊस झाला.

या पावसाने उंचसखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी झाडे व विजेचे पोल कोसळून मोठे नुकसान झाले रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ आग लागून काही प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे मरेमा विद्यालगत असलेल्या कै. सुशीलाबाई बागरेचा प्राथमिक शाळेच्या वर्गावरील पत्रे उडून ते भररस्त्यातच आडवे पडले. औरंगाबाद रेल्वे मार्गावर झाड आडवे पडले तर रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनवरही झाड कोसळले अनेक भागात विजेचे पोल पडले.वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे व विजेचे पोल पडल्याने मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...