आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राप्त:नाशिकच्या मानसी बिरारी-जाधव यांना मिसेस इंडिया इंटरनॅशनलचा मूकुट; प्रथम क्रमांकाचा मानाचा मुकुट प्राप्त

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई येथे झालेल्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल वर्ल्ड २०२२ स्पर्धेत नाशिकच्या मानसी बिरारी-जाधव यांना प्रथम क्रमांकाचा मानाचा मुकुट प्राप्त झाला. दिवा मिसेस वेस्ट इंडिया एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया या नावाने पहिली स्पर्धा पुणे येथे ३१ मेला पार पडली होती. या स्पर्धेत मिसेस वेस्ट इंडिया कॅटवाॅक आणि मिसेस वेस्ट इंडिया बेस्ट ड्रेस म्हणून पारितोषिक मिळाले.

या स्पर्धेनंतर १५ जूनला मिसेस इंडिया इंटरनॅशनल या स्पर्धेसाठी मानसी बिरारी यांची निवड झाली. ही स्पर्धा दुबईमधील बही अजमान पॅलेस येथे १५ जूनला पार पडली. या स्पर्धेत मिसेस इंडिया इंटरनॅशनल वर्ल्ड २०२२ स्पर्धेचा पहिला मुकुट नाशिकच्या मानसी बिरारी जाधव यांना मिळाला. तसेच मिसेस इंडिया इंटरनॅशनल कॉन्फीडंटचा सॅश यावेळी मानसी यांना मिळाला. दुबई येथील महाराणी मोना अल मन्सुरी यांच्या हस्ते हा मुकुट प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल ज्युरींकडून या स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. यासाठी मानसी बिरारी यांना पती अक्षय जाधव, स्वराली मुळे, स्वराली देवलीकर यांच्यासह देवानंद बिरारी, वंदना बिरारी, अमोल जाधव, संगीता जाधव या कुटुंबातील सदस्यांकडूनही प्रोत्साहन मिळाले.

बातम्या आणखी आहेत...