आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा संकलन:अनेक घंटागाड्याच गायब; कचरा संकलन मात्र जाेमात

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेटीच्या काेटी उड्डाणे घेणाऱ्या घंटागाडीचा नवीन ठेका तब्बल वर्षभरानंतर सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसात नियाेजित ३९८ घंटागाड्यांपैकी केवळ सरासरी २९० घंटागाड्याच रस्त्यावर फिरत असून एकीकडे ठेक्यात निश्चित केलेल्या घंटागाड्यांपेक्षाही कमी वाहने असताना कचरा संकलन मात्र ७५० मेट्रिक टनापर्यंत पाेहाेचले आहे.

त्यामुळे नवीन घंटागाड्यांचा पायगुण म्हणून कचरा संकलन वाढले की, कागदाेपत्री कचरा वाढीव दाखवण्याचा प्रकार सुरू तर नाही ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाने संपूर्ण क्षमतेने गाड्यांद्वारे कचरा संकलन सुरू असल्याचा दावा करीत लहान घंटागाड्या खत प्रकल्पावर जात नसल्यामुळे त्यांची संख्या दिसत नसल्याचा दावा केला आहे.

१७५ काेटी रुपयांचा घंटागाडीचा ठेका ३५४ काेटींवर गेल्यामुळे चांगले वादंग झाले हाेते. डिझेलच्या वाढीव किमती, कर्मचाऱ्यांचे वाढलेले किमान वेतन अशी नानाविध कारणे देत घंटागाडी ठेक्याच्या वाढीव रकमेचे समर्थन केले गेले.

सिडकाे, पंचवटीमुळे कचरा संकलनात झाली वाढ
घंटागाड्यांची संख्या वाढल्याने कचरा संकलनाच्या क्षमतेतही वाढ झाली आहे. शिवाय, पंचवटी व सिडकाेत यापूर्वीच्या ठेक्यातील गाेंधळात पडून असलेला कचरा खत प्रकल्पावर पाेहाेचल्यामुळे वाढीव संकलन झाले आहे. लहान घंटागाड्या खत प्रकल्पावर येत नसल्यामुळे ३९८ एेवजी सरासरी तीनशे वाहनांची नाेंद आहेत. बाकी वाहने जीपीएस ट्रॅकवर आहेत. - डाॅ. आवेश पलाेड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन

बातम्या आणखी आहेत...