आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:अनेक शाळांची १०० टक्के निकालाची परंपरा कायम; विद्यार्थ्यांचे कौतुक

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक शाळांची १०० टक्के निकालाची परंपरा कायम; विद्यार्थ्यांचे कौतुक

शालांत परीक्षेत यंदाही १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांचे प्रमाण वाढले. विभागात नाशिक जिल्ह्याचा निकाल मात्र यंदा सरासरी कमी लागला. मुलांपेक्षा मुलीच यंदाही टॅापर ठरल्या. आयटी, इंजिनिअरिंगशिवाय यंदा विद्यार्थ्यांनी कला शाखेत प्रवेशाचा मार्ग बोलून दाखविला. नाशिक शहरातील सर्वच शाळांच्या निकालाची टक्केवारी वाढली. नाशिक शहर, नाशिकरोड, इंदिरानगर, सिडको, पंचवटी आदी भागातील शाळांनी यशाची पताका यंदाही फडकावली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलने दहावीच्या निकालात उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. हायस्कूलचा निकाल ९९.३५ टक्के लागला. परीक्षेसाठी एकूण ७७१ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. आणि त्यापैकी ७६६ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहे. ५०५ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. तर २०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. ओमकार माळोदे ९८.८० टक्के, अनिरुद्ध लोहार ९८.२० टक्के, श्रेया काळे ९८ टक्के, गायत्री चौधरी ९८ टक्के आणि प्रिया लहामगे ९८ टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॅा. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमाताई पवार, संचालक सचिन पिंगळे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारूंगसे, उपमुख्याध्यापक संजय डेर्ले, पर्यवेक्षक शरद शेजवळ यांनी अभिनंदन केले आहे.बी.एल.श्रीवास्तव, हरनारायण अग्रवाल, कृपाशंकर सिंह, अनिता अग्रवाल, मुख्याध्यापक सुभाषचंद्र मिश्रा, समन्वयक अंजना जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

वनिता विकास मंडळ प्रशाळेचे यश

नाशिकरोड येथील वनिता विकास मंडळ संचालित, माध्य. विनायक मंदिर प्रशाळेचा दहावीचा निकाल ८७ टक्के लागला. कोमल दिलीप खैरनार हिने ९३ टक्के मिळवून प्रथम, द्वितीय भास्कर भूषण मोहन (९१), तृतीय क्रमांक खुशाल साहेबराव पाथरे (८२ टक्के) गुण मिळविले कार्यवाह सुनीती देशपांडे, सहकार्यवाह कविता देशपांडे, मुख्याध्यापक अनिल नागरे, मुख्याध्यापिका रेखा पाचपांडे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...