आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. आजच्या या सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे होत्या. व्यासपीठावर प्रशांत पाटील (प्राचार्य,राजर्षी शाहूमहाराज पॉलीटेक्निक,नाशिक) उपमुख्याध्यापक मोरे सर, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे उपस्थित होते.
विभागीय जलतरण स्पर्धा दिनांक 11 डिसेंबरला नाशिक रोड येथील जिजामाता तलावामध्ये पार पडली. या स्पर्धेमध्ये मराठा हायस्कूलचा विद्यार्थी रुद्र घनःश्याम बच्छाव इयत्ता सातवीतल्या या विद्यार्थ्याने 100 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 50 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 100 मीटर फ्री स्टाइल मध्ये त्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आज विद्यालायातर्फे या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस ॲड.नितीन (भाऊ) ठाकरे , चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती डी.बी.मोगल, नाशिक शहर तालुका संचालक ॲड. लक्ष्मणराव लांडगे, नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश (आबा) पिंगळे व सर्व संचालक मंडळ, मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.भास्करराव ढोके,शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.अशोकराव पिंगळे,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चंद्रजित शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य,पालक - शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना तवारुंगसे,उपमुख्याध्यापक मोरे सर, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभागीय पातळीसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्याला विद्यालयातील क्रीडा शिक्षक संजय होळकर, सुहास खर्डे, बाळासाहेब रायते, राजाराम पोटे, हरिभाऊ डेर्ले, मंगला शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.