आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा सत्कार:टेनिकॉईट स्पर्धेत मराठा हायस्कूल चमकले ; स्पर्धेत घवघवीत यश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी टेनिकॉईट स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास आवश्यक असून क्रिडा गुण प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करावे. यामुळे शारिरीक व बाैद्धीक वाढ हाेत असते, असे प्रतिपादन मराठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे यांनी व्यक्त केले.

यावेळी मुख्याध्यापिका वारुंगसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रमाकांत मोरे पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे उपस्थित होते. यशवंत विद्यालय, नंदुरबार येथे शालेय विभागीय टेनिकॉईट स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या संघाने धुळे जिल्हा व नंदुरबार संघास पराभूत करून नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड झाली. स्पर्धेमध्ये निखिल दिघे, सोहम पडोळ ओंकार कसबे, सोपान कसबे, सिद्धेश माळोदे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला होता.

या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संजय होळकर, सुहास खर्डे,बाळासाहेब रायते, हरिभाऊ डेर्ले, राजाराम पोटे,मंगला शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस ॲड.नितीन (भाऊ) ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती डी.बी.मोगल, नाशिक शहर तालुका संचालक ॲड. लक्ष्मणराव लांडगे, नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश (आबा) पिंगळे व सर्व संचालक मंडळ,मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.भास्करराव ढोके, शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.अशोकराव पिंगळे, शिक्षणाधिकारी चंद्रजित शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, शिक्षक संघाचे अध्यक्ष पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...