आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन मराठा मोर्चा आक्रमक, विजय वडेट्टीवारांची सरकारमधून हकालपट्टी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करु नका

मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. ओबीसींसह इतर मुलांचे वय वाढत असून त्यांना वेठीस धरायला नको, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. यावरून वडेट्टीवार यांच्याविरुद्ध मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. वडेट्टीवारांची सरकारमधून हकालपट्टी करण्याची मागणी देखील मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. वडेट्टीवारांची हकालपट्टी करण्यासोबतच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करु नका, अशी विनंतीही मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?

‘मराठा समाजासोबतच ओबीसींवरही अन्याय व्हायला नको. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, ओबीसींसह इतर मुलांचे वय वाढत असून त्यांना वेठीस धरायला नको, नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत.