आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Maratha Reservation Updates: Agitation Postponed For A Month, Sambhaji Raje's Announcement After The Agitation In Nashik; News And Live Updates

मराठा आरक्षण:बहुतांश मागण्या मान्य; पूर्ततेसाठी मराठा समाजाचे मूक आंदोलन महिनाभर स्थगित; नाशकातील आंदोलनानंतर संभाजीराजे यांची घोषणा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मूक आंदोलनावेळी संभाजीराजे छत्रपती आणि ओबीसी नेते छगन भुजबळ समोर येताच त्यांनी एकमेकांचे अभिवादन केले. - Divya Marathi
मूक आंदोलनावेळी संभाजीराजे छत्रपती आणि ओबीसी नेते छगन भुजबळ समोर येताच त्यांनी एकमेकांचे अभिवादन केले.
  • सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुनर्विलोकन याचिका

काेल्हापुरातील आंदोलनानंतर मुंबईत मुख्यमंत्र्यांसाेबत बैठकीत बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून त्यांच्या पूर्ततेसाठी कमीत कमी २१ दिवस लागण्याची शक्यता अाहे. त्यामुळे सरकारच्या विनंतीनुसार अांदाेलन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी (दि. २१) येथे राज्य समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, आंदोलन जरी महिनाभर हाेणार नसले तरी प्रत्येक जिल्ह्यात यासंदर्भात बैठका मात्र हाेणार अाहेत. महिनाभरात सरकारने उर्वरित मागण्यांसंदर्भात अंतिम निर्णय घेतला नाही तर पुढील दिशा ठरवावी लागेल, असा इशारा देतानाच गुरुवारी सर्वाेच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करणार अाहे. त्याचबराेबर ३३८ (ब) कलमानुसारची प्रक्रियाही सुरू केली पाहिजे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नाशिकमध्ये सोमवारी मूक अांदाेलनानंतर राज्यभरातील समन्वयकांची बैठक शिवनेरी विश्रामगृह येथेे झाली.

मुख्यमंत्र्यांसाेबत सारथीचा विषय झाला. प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह हवे अशी मागणी हाेती, ज्या जिल्ह्यात वसतिगृहे नाहीत त्या ३६ पैकी २३ जिल्ह्यांत जागा, इमारती उपलब्ध अाहेत, ती यादी या बैठकीत ठेवली गेली. सारथीसाठी एक हजार काेटी रुपये अाम्ही मागितले हाेते. पुण्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली अाहे.

अनेक मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून बहुतांश मागण्या मान्य केल्या अाहेत. त्यामुळे सरकारने मागितलेला पुरेसा वेळ देत महिनाभर अांदाेलन पुढे ढकलत असल्याची घाेषणा युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केली. बैठकीला करण गायकर, तुषार पगार, राजू देसले, गणेश कदम, किशाेर चव्हाण यांच्यासह राज्यभरातील समन्वयक उपस्थित हाेते.

ओबीसी, धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही प्रयत्न
ओबीसींवरदेखील कसा अन्याय झाला हे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. छत्रपती शाहूंचा वंशज म्हणून समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करील. ओबीसी, धनगर समाजाच्या अारक्षणासाठी मी त्यांच्याही साेबत अाहे, असेही संभाजीराजे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...