आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूक आंदोलन:संसद, विधिमंडळात आवाज उठवण्याची एकमुखी ग्वाही; मराठा आरक्षणासाठी नाशकात सर्वच लोकप्रतिनिधींचा पाठिंबा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याच्या जे हाती आहे ते तरी मार्गी लावा : छत्रपती संभाजीराजे

मराठा अारक्षणाला राज्यासह केंद्राच्या सत्तेतील तसेच विरोधी सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला असल्याने पक्षीय भूमिका वेगळ्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयात अारक्षण टिकले नाही, परंतु आता ते मिळवण्यासाठी विधिमंडळ, संसद असाे की दिल्लीला कूच करावी लागाे... अाम्ही सगळे मराठा समाजाच्या सोबत अाहाेत, अशी एकमुखी ग्वाही जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांनी साेमवारी (दि. २१) नाशकात दिली. राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असले तरी ती स्वीकारली गेली नाही तर क्युरेटिव्ह पिटिशन टाकावी. घटनेच्या ३३८ (ब) कलमानुसार राज्य सरकारने आरक्षणाचा प्रस्ताव राज्यपालांना व त्यांनी राष्ट्रपतींना द्यावा. तेथून संसदेत मंजुरी व मग हा प्रस्ताव राज्य व केंद्रीय मागासवर्ग अायाेगाकडे मंजुरीसाठी द्यावा असे पर्याय अाहेत. मात्र, सध्या राज्य शासनाच्या जे हातात अाहे ते तरी तातडीने मार्गी लावावे, असे अावाहन या वेळी युवराज छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित लाेकप्रतिनिधींना केले.

सकल मराठा समाज, मराठा क्रांती माेर्चातर्फे येथील मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या रावसाहेब थाेरात सभागृह मैदानावर मूक आंदोलन करण्यात अाले. युवराज छत्रपती संंभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या अांदाेलनास पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री सदाभाऊ खोत खासदार हेमंत गोडसे, खासदार डाॅ. भारती पवार, खासदार डाॅ. सुभाष भामरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार व मोठ्या संख्येने समाजबांधव या वेळी उपस्थित होते. तसेच अामदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, डाॅ. राहुल अाहेर, राहुल ढिकले, सुहास कांदे, नरेंद्र दराडे, दिलीप बनकर, अॅड. माणिकराव काेकाटे, सराेज अहिरे, हिरामण खाेसकर यांनी मराठा अारक्षणाला नेहमीच पाठिंबा दिल्याचे या वेळी सांगितले.

मराठा आरक्षणाला माझा नेहमीच पाठिंबा : छगन भुजबळ
मराठा आरक्षणाला माझा आणि माझ्या पक्षाचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते द्यावे ही सर्वपक्षीय भूमिका असून माझीही आहे. आज मराठा आणि ओबीसी दोन्हीही समाजाची अारक्षणे सर्वाेच्च न्यायालयाने रद्द केली आहेत. अाेबीसींनी काढलेले अाक्राेश माेर्चे मराठा समाजाच्या विराेधात नाहीत. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्याच्या जे हाती अाहे ते तरी मार्गी लावा : छत्रपती संभाजीराजे
अारक्षण रद्द झाल्यानंतर स्थिती गंभीर अाहे. दोन मिनिटे लागतात आक्रोश तयार करायला, वातावरण गढूळ करायला. पण हे अाम्हाला शाेभा देणारे नाही. समाजाला दिशा देण्याची छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीची जबाबदारी म्हणून एक माध्यम म्हणून मी अांदाेलनाचे नेतृत्व करीत अाहे. समाज बोललाय, आता लोकप्रतिनिधींनी अारक्षणाबाबत बाेलावे. तेच राज्यभरात अाम्ही एेकून घेणार अाहाेत. आम्हाला ३६ जिल्ह्यांत जाऊन आंदोलनाची इच्छा नाही. कुठल्याही लाेकप्रतिनिधीबद्दल अामचा अाकस नाही किंवा आमचं अांदाेलन कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. राज्य शासनाच्या हाती जे अाहे ते तरी तातडीने मार्गी लावले पाहिजे अशी अपेक्षा अाहे, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

वेळ पडली तर दिल्लीत कूच करायलाही तयार : मंत्री भुसे
मराठा समाजात अनेक गरीब असून भावी पिढीसाठी आरक्षण गरजेचे अाहे. किमान राज्य सरकारकडून ज्या अपेक्षा पूर्ण हाेणे अपेक्षित अाहे त्याप्रश्नी तरी समाजबांधवांना अांदाेलन करावे लागणार नाही, इतकी ग्वाही सरकारचा घटक म्हणून मी देताे. जर आरक्षणासाठी दिल्लीत कूच करायची असेल तरी अाम्ही सर्वजण साेबत अाहाेत. काही लाेक अारक्षणाच्या विषयातही मढ्याच्या टाळूवरचे लाेणी खात अाहेत, अशांना समाजबांधवांनीच अाता खड्यासारखे बाहेर काढले पाहिजे.

येत्या पावसाळी अधिवेशात करणार चर्चा : नरहरी झिरवाळ
इतर काेणत्याही समाजाच्या अारक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला अारक्षण दिलेच पाहिजे ही सर्वच अामदारांची भूमिका अाहे. येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात यावर हाेणाऱ्या चर्चेत पूर्णपणे मी अापला सहभाग देईन. जिल्ह्यातील सर्वच अामदार, खासदार मराठा समाजाला अारक्षण मिळण्यासाठी अापल्या पाठीशी अाहाेत, असे विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...