आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ सोशल मीडियाद्वारे संपर्क आला, मराठी साहित्य वाचन चळवळ समजली आणि त्यातूनच मग ह्यूस्टन-टेक्सास येथील मराठी कुटुंबीयांच्या घरात ग्रंथपेट्यांद्वारे ते साहित्य रवाना होते आहे... ही गोष्ट आहे मूळचे भारतीय, पण सध्या टेक्सास येथे असलेले अमोल भोमे आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारीचे विनायक रानडे यांची.
ह्यूस्टन - टेक्सास येथे वास्तव्यास असलेले, पण मूळचे भारतीय असलेले वाचनप्रेमी अमोल भोमे यांनी ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे विनायक रानडे यांच्याशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधला आणि योजना समजून घेतली, त्यांना वाचनासाठी उपयुक्त अशी ही योजना खूपच भावली, त्यांनी त्यातील सर्व बारकावे आणि वाचनानंदासाठी किती उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध केली जातात हे समजून घेतले. ह्यूस्टन - टेक्सास येथील मराठी साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि बघता बघता ह्यूस्टन - टेक्सास येथील १० वाचक कुटुंबानी सक्रिय सहभाग नोंदवला त्यामुळे आता अमोल भोमे, समन्वयक ह्युस्टन - टेक्सास यांच्या पुढाकाराने १४ ग्रंथपेट्या ह्यूस्टन - टेक्सास येथे रवाना होत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.