आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऐन थंडीत डिसेंबरच्या सुरुवातीला अवकाळी पावासाने बागलाणमध्ये अर्ली द्राक्षांचे तब्बल ८५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असताना याच तालुक्यातील खिरमणी गावातील एका शेतकऱ्याच्या तीन एकर बागेतील द्राक्षे मात्र पूर्णपणे सुरक्षित आहेत. पावसाच्या फटक्याने बागा उद्ध्वस्त होत असताना हंसराज भदाणे या उच्चशिक्षित तरुणाने प्लास्टिकचे क्रॉप कव्हर वापरून ही किमया साधली.
जिल्ह्यात मालेगाव, देवळा आणि बागलाण तालुक्यात अर्ली द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. एकट्या बागलाणमध्ये १८०० हेक्टर द्राक्ष उत्पादन घेतले जाते, यामध्ये रंगीत आणि सफेद वाणाचे द्राक्ष उत्पादन घेण्यात येते. परंतु गत तीन वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे या भागातील उत्पादक कर्जबाजारी झाले आहेत. परंतु भदाणे यांनी आपल्या बारा एकरपैकी तीन एकर थॉमसन जातीच्या द्राक्षबागेवर प्लास्टिक क्रॉप कव्हर वापरून द्राक्षांचे संरक्षण केलेे. तसेच त्यांना आर्थिक प्राप्तीही चांगली झाल्याने उर्वरित बागांचे झालेले नुकसान भरून निघणार आहे.
क्रॉप कव्हरमुळे हे फायदे
- मुबलक सूर्यप्रकाश मिळतो. रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- पाऊस आणि गारपिटीपासून संरक्षण.
- रंगीतपेक्षा सफेद वाणाची प्रतवारी उत्कृष्ट होऊन निर्यातक्षम द्राक्षांना मिळतो अधिक दर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.