आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगीकरणाचा पर्याय:एसटी सुस्थितीत चालवण्यासाठी व्यवस्थापन कंपनीकडे सोपवा, राज ठाकरेंनी दिला खासगीकरणाचा मंत्र

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबल्याशिवाय सेवा चांगली चालणार नाही असे सांगत, ही सेवा सुस्थितीत आणण्यासाठी एखादी व्यावसायिक मॅनेजमेंट कंपनी नेमावी, असा खासगीकरणाचा पर्याय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना गेली. मात्र त्यांना न्याय देण्याचे साेडून महाविकास आघाडीतील नेते अरेरावी करीत आहेत. महत्त्वाच्या मुद्द्यांवर थेट मुख्यमंत्र्यांनीच चर्चा करायला हवी, अशी मागणी करून एसटीचे लाख कर्मचारी अंगावर आले तर काय कराल, असाही सवाल राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.

काेराेनाची लागण झाल्यामुळे अडीच महिन्यांच्या अंतराने राज नाशिक दाैऱ्यावर आले होते या वेळी पत्रकारांशी बाेलताना राज यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. ‘मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. या देशात हिंदूंचं राज्य यायला हवं, राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर राज यांनी मग आता आफ्रिकन लोक देशावर राज्य करताहेत का?’ असा प्रश्न करून खिल्ली उडवली.

मनसे-भाजप युती मलाच माहीत नाही
शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार का, या प्रश्नावर बोलताना राज म्हणाले, “ते मला काय माहीत, तो प्रश्न त्यांना विचारा. त्यांच्या घरी पोर होईल का नाही हे मी कसं सांगू?’ युतीबाबत छेडले असता, मनसे व भाजपची युती केवळ मीडियातून हाेते, तुमचा साेर्स काय हे तरी सांगा, असा उलट सवाल त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...