आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:वनिता प्रशालेत मराठी राजभाषा दिन‎

नाशिकराेड‎‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वनिता विकास मंडळ संचलित‎ माध्यमिक विनय मंदिर प्रशालेत ज्ञानपीठ‎ पुरस्कार विजेते, कविवर्य कुसुमाग्रज तथा‎ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस‎ मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या‎ उत्साहात साजरा करण्यात आला.‎ अध्यक्षस्थानी प्रशालेच्या उपशिक्षिका‎ जयश्री जाधव होत्या. प्रमुख अतिथी‎ संस्थेच्या सहकार्यवाह कविता देशपांडे,‎ मुख्याध्यापक अनिल नागरे, ज्येष्ठ शिक्षिका‎ अनू रेंगडे उपस्थित होत्या. प्रथम वि. वा.‎ शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात‎ आले. त्यानंतर इयत्ता नववीच्या‎ विद्यार्थिनींनी इशस्तवन सादर केले. इयत्ता‎ पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी तात्यासाहेब‎ शिरवाडकर यांच्या कविता व त्यांच्याविषयी‎ माहिती दिली. तसेच मराठी संताविषयी‎ माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा‎ जयश्री जाधव यांनी वि. वा. शिरवाडकर‎ यांच्या विषयी माहिती दिली. उपशिक्षक‎ चेतन पाठक यांनी विविध मराठी‎ बोलीभाषेतील काही वाक्य सादर केली.‎

बातम्या आणखी आहेत...