आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:संमेलन स्थगितीचा निर्णय प्रलंबित ठेवणे शक्य नाही; काैतिकराव ठाले-पाटील यांचे पत्र

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्चमध्ये २६, २७, २८ या तारखांना नाशिकला हाेणारे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काेराेनामुळे स्थगित करण्यात आले हाेते. मात्र, काेराेनाची महाराष्ट्रभर निर्माण केलेली स्थिती पाहून ते रद्दच करायला हवे हाेते. हे संमेलन जूनअखेर घेता येईल हा अंदाजही चुकला. आता यापुढे संमेलन स्थगितीचा निर्णय प्रलंबित ठेवणे शक्य नाहंी. त्यामुळे निमंत्रक संस्थेने याबाबत भूमिका ३१ जुलैपर्यंत कळवावी, असे पत्र साहित्य महामंडळाचे अध्यक्ष काैतिकराव ठाले-पाटील यांनी लाेकहितवादी मंडळाला, संमेलनाचे प्रमुख कार्यवाह, निमंत्रकांना तसेच स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना पाठविले आहे.

साहित्य महामंडळाने पाठविलेल्या या पत्रात आयाेजक संस्थेला संमेलन कधी, कसे हाेणार, त्याबाबत कशी तयारी असेल किंवा नसेल यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले आहेत. त्या सर्व प्रश्नांचा विचार करून संमेलनासंबंधीची लाेकहितवादी मंडळाची व स्वागत मंडळाची भूमिका ३१ जुलैपर्यंत स्पष्टपणे कळवावी, असे पत्रात म्हटले आहे.

आयाेजक लाेकहितवादी मंडळ व स्वागत समितीची भूमिका जाणून घेतल्यावरच संमेलन आणखी दीडेक महिना स्थगित करायचे की, तूर्त यावर्षी नाशिकपुरते साहित्य संमेलनच रद्द करायचे आणि झालेली संपूर्ण प्रक्रियाच रद्द करून सर्वांना यातून मुक्त करायचे यासंबंधीचा निर्णय साहित्य महामंडळाला घेता येईल. आयाेजक संस्थेने आपली भूमिका ३१ जुलैपर्यंत कळवावी. जर दिलेल्या मुदतीत महामंडळाला काहीच कळविले नाही तर आता साहित्य संमेलन घेण्यास आपण उत्सुक नाही असा त्याचा अर्थ हाेईल, असेही सूचक विधानही या पत्रात केलेले आहे.

एक-दाेन दिवसांत पदाधिकाऱ्यांची बैठक
महामंडळाने पत्र दिल्यानंतर सगळे पदाधिकारी, स्वागत समितीचे सदस्य यांच्याबराेबर एक बैठक घेऊन चर्चा केल्यानंतरच काय ताे निर्णय हाेणार आहे. एक-दाेन दिवसांत यासंदर्भात बैठक घेणार आहाेत. तसेच साेमवारी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना पत्र देऊन चर्चाही करण्यात येणार आहे. आपली तयारी आहेच. पण तिसरी लाट, इतर परवानगी या सगळ्यांचा विचार करूनच सर्व पदाधिकारी निर्णय घेतील व महामंडळाला कळवतील. - जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख कार्यवाह, साहित्य संमेलन, नाशिक

महामंडळाने विचारले हे प्रश्न
- काेराेनाची स्थिती नाशिकला संमेलन घेण्यासारखी आहे का?
- शासन आणि स्थानिक प्रशासन संमेलन घेऊ देण्यास अनुकूल प्रतिसाद देतील का?
- आयाेगक संस्था म्हणून आपली व लाेकहितवादी मंडळाची संमेलन घेण्याची तयारी आहे का?
- तयारी असेल तर कधीपर्यंत म्हणजे काेणत्या महिन्याच्या काेणत्या आठवड्यात संमेलन घेण्याची तयारी आहे?
- शासनाने अनुदान नाकारले तर काटकसरीचा मार्ग अनुसरला तरीही आटाेपशीर संमेलनाला आवश्यक निधी जमा हाेईल का?

बातम्या आणखी आहेत...