आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 बाजार समित्यांच्या 30 एप्रिलच्याआत निवडणूका:हायकोर्टाचे आदेश, मतदारयाद्या नव्या होण्याची शक्यता, निवडणूक कार्यक्रम 15 मार्चपासून?

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या बाजार समित्यांच्या निवडणूका हाेणे बाकी आहे त्यांची निवडणूक 30 एप्रिलपर्यत पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणूकांचा मार्ग माेकळा झाला आहे.

जिल्ह्यात 17 बाजार समित्या असून सटाणा, उमराणा, नामपुर या तिन बाजार समित्या वगळता उर्वरीत बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम 15 मार्चपासून सुरू हाेण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, मतदार याद्यांचा कार्यक्रम देखील नव्याने जाहीर हाेण्याची शक्यता देखिल वर्तवली जात आहे.

ज्या बाजार समित्यांवर सध्या प्रशासक आहे, तेथे तेच कायम ठेवण्यात येणार असून ज्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे किंवा संचालक मंडळ कार्यरत आहे तेथे प्रशासक नेमायचा किंवा कसे? याचे अधिकार सक्षम अधिकाऱ्याकडे म्हणजे, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे देण्यात आले आहेत. मतदार याद्यांबाबत अद्याप कुठल्याही स्वतंत्र मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या नसल्याचे जिल्हा उपनिबंधक डाॅ. सतीश खरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील चाैदा बाजार समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला हाेता, ताे जेथे थांबला हाेता तेथूनच सुरू केला जाताे का? पून्हा प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम नव्याने दिला जाताे हे पहाणे आता महत्वाचे ठरणार आहे. मात्र, 30 एप्रिलच्या आत निवडणूक घ्यायच्या असतील किमान 45 दिवस अगाेदर म्हणजे, 15 मार्चला निवडणूक कार्यक्रम लागू शकताे अशी दाट शक्यता देखिल वर्तवली जात आहे.

जिल्ह्यातील माेठ्या बाजार समित्यांचा समावेश

नाशिकसह पिंपळगाव बसवंत, लासलगाव, येवला, इगतपुरी, देवळा, चांदवड अशा माेठ्या बाजार समित्यांचा समावेश या चाैदा बाजार समित्यांमध्ये आहे. त्यांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला हाेता. आता या निर्णयामुळे मात्र निवडणूकांचा मार्ग माेकळा झाला असून ग्रामीण भागात पुन्हा एकदा निवडणूकीचा धुराळा उडणार आहे. गावपातळीपर्यंत या निवडणूकीच्या हालचाली पहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...