आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह:निरोगी व्यक्तीशी विवाह; विवाहाअगोदर सिकलसेल तपासणी करा

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिकलसेल हा आजार अनुवंशिक आहे. त्यामुळे विवाह करताना या आजाराची तपासणी होणे गरजेचे असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या विद्यमाने सिकलसेल आजार नियंत्रण दिनाचा कार्यक्रम जिल्हा रुग्णालयात घेण्यात आला. हा आजार अनुवंशिक असून रक्ताशी निगडित आहे. अशक्तपणा, सांधेदुखी, सूज येणे, निमिया होणे, सतत आजारी पडणे, डोळे खोल जाणे, जखम लवकर भरून न येणे, लघवी करताना त्रास अशी लक्षणे आढळतात. तपासण्या कशा करायच्या याबद्दल सुजाता बागड यांनी माहिती दिली.

निरोगी व्यक्तीशी विवाह करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणी टाळू शकतो. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, डॉ. राहुल हाडपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...