आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार:पहिले लग्न लपवत वकील महिलेशी लग्न, हुंडा न दिल्याने छळ

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीने पहिले लग्न झाल्याचे लपवत एका वकील महिलेशी लग्न करत फसवणूक केल्याप्रकरणी तसेच लग्नात हुंडा दिला नाही म्हणून छळ करत स्त्रीधन आणि एटीएम कार्डद्वारे बँकेतील पैसे काढून घेत अपहार केल्याप्रकरणी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार, २४ ऑक्टोबर २०२० ला लग्न झाले. संशयितांनी मुलाचे पूर्वी लग्न झाल्याचे लपवून ठेवले. सासू-सासऱ्यांनी तुझ्या आई-वडिलांनी मोठा हुंडा दिला नाही म्हणून मारहाण व वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली. पतीने शारीरिक व मानसिक छळ करत लग्नात दिलेले दागिने व इतर वस्तू तसेच आधारकार्ड, एटीएम कार्डद्वारे पैसे काढून घेत अपहार केला. पीडितेने न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित पतीसह सासरच्यांवर फसवणूक, कटकारस्थान, हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात जानेवारी ते आॅगस्टअखेर ३७ सोनसाखळी लुटीच्या घटनांत सुमारे १८ लाख ५० हजारांचे स्त्रीधन लुटून नेल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष बाब म्हणजे यातील अवघे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. गणेशोत्सवकाळातही लुटमारीच्या घटना सुरूच असून ऐन सणोत्सवात सोनसाखळीचोरांनी डोके वर काढल्याचे वाढत्या गुन्ह्यांतून दिसून येत आहे.

अंबड परिसरात एका १६ वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित मुलाच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घरी १३ वर्षीय मुलगी एकटी असताना शेजारील संशयित मुलाने घरात येऊन मुलीचा हात पकडून त्याच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार मुलीच्या चुलतीच्या लक्षात आला. बाहेर गर्दी झाल्यानंतर संशयित मुलाने घरातून पळ काढला. नातेवाइकांनी मुलीची सुटका केली. पोलिसांना हा प्रकार कळवण्यात आला. मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...