आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा सहभाग:गीतेच्या 15 व्या अध्यायाचे सामूहिक वाचन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ना. ए. साेसायटीच्या उंटवाडी माध्यमिक विद्यालयात गीता जयंतीनिमित्त गीतेच्या १५ व्या अध्यायाचे सामूहिक वाचन विद्यार्थ्यांनी केले. गीतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन इ ८वी ब च्या वर्गाने केले होते. वर्गशिक्षिका सुहासिनी जोशी यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी विशाखा महाजन, संस्कृती बच्छाव, नमिता खैरनार ,मानव पाटील, गिरीश चौधरी, सागर मोहतमल यांनी गीतेचे महत्त्व व उपदेश विद्यार्थ्यांना सांगितले.

पर्यवेक्षक साहेबराव राठोड व रसिका कुलकर्णी यांनी जीवनात गीतेचे महत्त्व व स्थान याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. सुहासिनी जोशी यांनी सामूहिकरीत्या गीतेच्या १५ व्या अध्यायाचे पारायण घेतले. संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे तथा मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्राची डावखर, प्रियदर्शनी मोरे, हर्षदा शिंपी यांनी स्वागत गीत सादर केले. गीतेचे महत्व विद्यार्थ्यांना समजवून सांगण्यात आले.

सूत्रसंचालन लीना सोनार हिने केले तर आभार प्रणाली चव्हाण या शालेय विद्यार्थ्यांनी मानले. उपमुख्याध्यापिका राजश्री चंद्रात्रे, पर्यवेक्षक साहेबराव राठोड,रवींद्र हात्ते, संस्था सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी विजय मापारी, ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार, अनुजा देशमुख, सुनंदा कुलकर्णी व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...