आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार गोदामाला भीषण आग:सातपूर-अंबड लिंक रोडवरील घटना, परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण, लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी l नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भंगार मार्केटच्या गोदामास आग लागल्याने नागरिकांच्या पोटात भितीचा गोळा उठला. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.

ज्या भंगार गोदामास आग लागली त्यात फोम, केमिकलसारखे ज्वलनशील पदार्थ व साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. शब्बु मकडूम यांनी गोदामची जागा भाड्याने घेतलेली आहे. मात्र, त्याने जागा मालकाचे नाव माहीत नसल्याचे सांगून पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, शिंगाडा तलाव येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयासह सातपूर, सिडको, पंचवटी, अंबड अशा पाच केंद्रावरील बंबाच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. असे असले तरी गोदामात रासायनिक पदार्थ असल्यामुळे आग धुसमसतच होती.

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

सातपूर अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केट हटवल्यानंतरही मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भंगार व्यावसायिकांनी पुन्हा हळू हळू पाय पसरविण्यास सुरुवात केली. सातपूर अंबड लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात भंगारची दुकाने व गोडाऊन असल्याचे पुन्हा एकदा रविवारी लागलेल्या आगीमुळे उघड झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...