आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक वादालय:निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावानाच्या सभेत प्रचंड गदारोळ

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावानाची निवडणूक होणार मे महिन्यात
यशवंतराव चव्हाणांनी दिलेली जागा, कुसुमाग्रजांनी त्या जागेचे केलेले मंदिर, पुलंचा पदस्पर्श असा वारसा घेऊन १८१ वर्षांच्या सावानाच्या वास्तूनेही अश्रू ढाळले.चव्हाण-कुसुमाग्रज जिथे कुठे असतील त्यांनी नक्कीच एकमेकांना प्रश्न विचारला असेल की याचसाठी केला होता का अट्टहास. मोठ्या विश्वासाने आपण ही संस्था या पदाधिकाऱ्यांच्या आणि सभासदांच्या हातात दिल्याचा त्यांना नक्कीच पश्चात्ताप झाला असेल. गदारोळ, गटातटाचे राजकारण, हमरीतुमरीवर येत सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सभा प. सा. नाट्यगृह, सावानाची वास्तू आणि सुज्ञ सभासदांना रविवारी (दि. १३) पाहावी लागली. एकप्रकारे सार्वजनिक वादालय असे रूप या सभेतून दिसले.

अध्यक्ष निवड बेकायदेशीर; संध्याकाळी आगपाखड
आजची सावानाची वार्षिक सभा कोरम अभावी १० वाजता तहकूब केली १०.३० सभा सुरू झाली. तहकूब सभेत आयत्या वेळेस येणारे विषय घेता येत नाही तरीही दादागिरीने आयत्यावेळी काही विषय मंजूर केले गेले ते ग्राह्य धरता येत नाहीत. अध्यक्षाची निवड हा विषय तालिकेवर नव्हता तरी तो मंजूर करण्यात आला. ते बेकायदेशीर आहे. त्यावर कायदेशीर कार्यवाही होईलच. असे पदाधिकारी डॉ. धर्माजी बोडके यांनी मेसेजद्वारे संध्याकाळी कळविले.

आता असे असेल निवडणूक नियोजन
>३१ मार्चपर्यंत थकबाकीदार तसेच वर्गांतरासाठी मुदत
>७ एप्रिलपर्यंत प्रारूप यादी, हरकतीसाठी मुदत
>१५ एप्रिलपर्यंत अंतिम यादी
>३० एप्रिलपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास अर्ज दाखल करणे, छाननी, माघार वगैरे प्रक्रिया
>१ किंवा २ मे रोजी निवडणूक आणि नंतर लगेच निकाल.

सभासदांचे सवाल
भरत गोसावी : सभेपूर्वी सूचना व अहवाल मिळत नाही.
राजेश झणकर : नाट्यगृहाच्या खुर्च्या दुरुस्त करणार होते त्याचे काहीच झालेले दिसत नाही.
सचिन डोंगरे : संस्थेची वेबसाइट चालू नाही का?
सचिन निरंतर: अहवालात अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांचा फोटो का नाही?
सुहास भणगे: जे लोक कधी पुस्तके घेण्यासाठीही दिसत नाहीत ते सभेत येऊन मोठमोठ्याने बोलून सभेत गदारोळ घालतात.
सुनील चपडा : भविष्यातील योजनांची माहिती द्यावी.

बातम्या आणखी आहेत...