आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे वर्ग सुरू:पदव्युत्तर पदवी वर्ग आजपासून; पदवीचे वर्ग येत्या १ सप्टेंबरपासून होणार सुरू

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी वर्गाच्या परीक्षा अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षातील पदवीचे वर्ग सुरू होण्यास विलंब होत आहे. शहरातील एचपीटी काॅलेजमधील पदव्युत्तर पदवीचे वर्ग सोमवार दि. २२ आॅगस्टपासून सुरू होत आहे. तर पदवीचे वर्ग येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, केटीएचएम महाविद्यालयाने पदवी प्रथम वर्षाचे सर्व १३ अभ्यासक्रमांचे वर्ग मागील आठवड्यातच सुरू केले आहेत.

वर्गखोल्या शिल्लक नसल्याने प्रत्यक्ष पदवी प्रथम वर्ष आणि पदव्युत्तरचे वर्ग सुरू करण्यात अडचण येत असल्याचे एचपीटी महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. पण तरीही २२ आॅगस्टपासून पदव्युत्तरचे तर १ सप्टेंबरपासून बी.ए. आणि बीएसस्सीसह इतर पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे वर्ग सुरू करणार असल्याचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी सांगितले.केटीएचएम महाविद्यालयातील प्रथम वर्ष पदवीचे बी-व्होकसह सर्व १३ अभ्यासक्रमांचे वर्ग आठवडाभरापासून सुरू झाले आहेत. पदव्युत्तर पदवीचे द्वितीय वर्षाचे वर्ग १८ आॅगस्टपासून सुरू झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...