आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक कर्ज:मौलाना आझाद महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा वाढवली; 5 लाखावरुन 7.50 लाखावर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येणार आहे. यासंदर्भात शासनाकडून परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती मौलाना आझाद महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनिल भालेराव यांच्याकडून देण्यात आली.

मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्याकरिता 5 लाख रुपये इतकी कर्ज मर्यादा होती, ती वाढवून आता 7 लाख 50 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

याशिवाय, राज्य शासनाच्या भागभांडवलामधून राबविल्या जाणाऱ्या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेसाठी असलेली 2 लाख 50 हजार रुपयांची कर्जमर्यादा वाढवून आता ती 5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. यामुळे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुरेसे शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार असून, त्यांचा शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.

लाभार्थी प्रस्ताव सादर करावे

मौलाना आझाद महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा शासनाकडून वाढविण्यात आल्याने याचा फायदा गरजूंना होणार आहे. लाभार्थींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, मौलाना आझाद महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनिल भालेराव यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...