आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एमबीए सीईटी अर्ज; 11 मेपर्यंत मुदत; इंजिनिअरिंग, फार्मसीसाठीही अर्जाची संधी

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२२ व २०२३ या शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य आहेत. इंजिनिअरिंग, फार्मसी व कृषीनंतर आता एमबीए या पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी ११ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेले नाही, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असेल.

मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. १७ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची विहित मुदत होती.

या विहित मुदतीत वाढ करण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याची अखेरची संधी असेल. विद्यार्थ्यांना www.mahacet.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करून तो निश्चित करावा लागेल. ऑगस्ट महिन्यात या सीईटी परीक्षा होणार असून त्यानंतर कॅप राउंड प्रक्रियेद्वारे प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. नाशिकमध्ये २२ एमबीएची महाविद्यालये असून त्यात १९२० जागा उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...