आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षा:मेडिकल परीक्षा 16 जुलैपासून; तात्पुरते वेळापत्रक जाहीर

नाशिक10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसीएसई बाेर्डाच्या परीक्षेला परवानगी नाहीच

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्या शाखांच्या उन्हाळी सत्रातील अंतिम वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा १६ जुलैपासून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या सूचनेनुसार अंतिम वेळापत्रक विद्यापीठाच्या www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.

आयसीएसई बाेर्डाच्या परीक्षेला परवानगी नाहीच
मुंबई | काेराेना प्रादुर्भावामुळे इंडियन स्कूल प्रमाणपत्र परीक्षा बोर्डास (आयसीएसई) २ जुलैपासून दहावी अाणि बारावीची परीक्षा घेण्यास परवानगी देता येणार नाही, अशी माहिती राज्य शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

बातम्या आणखी आहेत...