आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:वैद्यकीय पूर्वपरीक्षेचा निकाल ७ सप्टेंबरला; नीटची प्रोव्हिजनल आन्सर की उपलब्ध

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची (नीट) प्रोव्हिजनल आन्सर की किंवा रेकॉर्डेड रिस्पॉन्स की मंगळवारी (दि. ३०) उपलब्ध झाली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ती जाहीर केली. यानुसार विद्यार्थ्यांना आपले गुण तपासता येतील. आन्सर की किंवा रेकॉर्डेड रिस्पॉन्सवर विद्यार्थ्यांना आक्षेप असेल तर प्रत्येक प्रश्नामागे २०० रुपये भरून ते नोंदवता येईल. गेल्या वर्षी (२०२१) हे शुल्क प्रतिप्रश्न तब्बल १ हजार रुपये होते, ते तब्बल ८०० रुपयांनी कमी करण्यात आल्याने विद्यार्थी सुखावले आहे. या परीक्षेचा अंतिम निकाल ७ सप्टेंबर रोजी neet.nta. nic.in वर जाहीर होईल.

‘एटीएन’ने माहितीपुस्तिकेत शुल्क कपातीचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे यंदा आन्सर कीवर आक्षेपांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एका आरटीआय याचिकेनुसार, २०२० मध्ये रेकॉर्डेड रेस्पॉन्सवर देशात ९८७० आक्षेप आले होते. यातून ‘एनटीए’ला १९ लाख ७४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दरवर्षी इतकेच आक्षेप दाखल होतात. एखाद्या विद्यार्थ्याचा आक्षेप योग्य असेल तरीही शुल्क परत मिळत नाही. प्रोव्हिजनल आन्सर कीवर आक्षेप दाखल झाल्यावर ‘एनटीएस’ एक्स्पर्टकडून तपासले जाते.

देशात तब्बल ३५७० तर विदेशात १७ परीक्षा केंद्र
यंदा देशातील १८ लाख ९३ हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षा दिली. नीटची ही सर्वाधिक परीक्षार्थी संख्या आहे. ४९७ शहरात ३५७० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. देशातच नव्हे, तर विदेशातही १७ केंद्रांवर या परीक्षेसाठी सोय करण्यात आली. नीटमधील स्कोअरवर मेडिकल कॉलेज व एम्समध्ये एमबीबीएस प्रवेश मिळताे. बीएस्सी नर्सिंगसाठीही ‘नीट’च्या आधारे प्रवेश मिळताे.

दीड महिन्याने निकाल
१७ जुलै रोजी नीटची परीक्षा झाली तर आन्सर की व रेकॉर्डेड रिस्पॉन्सबाबत २५ ऑगस्ट रोजी म्हणजे एक महिन्यानंतर सूचना जाहीर करण्यात आली. निकालाची तारीख ७ सप्टेंबरही उशिराने जाहीर करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...