आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीच्या संधी:औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज मेळावा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतर्फे मविप्र संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंगळवारी (दि. ३) सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत आयटीआय उत्तीर्ण झालेल्या सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा हाेणार आहे. दहावी किंवा बारावीनंतर आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अॅप्रेंटिसशिप व इतर विद्यार्थ्यांसाठी इपीपी अंतर्गत नोकरीसाठी मेळावा होत आहे.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध पदांच्या २०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविले जाणार आहेत. त्यात दहावी उत्तीर्ण तसेच बारावीनंतर आयटीआय ट्रेड उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

बातम्या आणखी आहेत...