आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार संभाजीराजेंनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. नाशिकमध्ये ही भेट झाली आसून यावेळी बहुजन समाजाला न्याय कसा द्यायचा यावर चर्चा झाली असे खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना शाहू महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार छगन भुजबळ हे आहेत, अशा शब्दांत संभाजीराजेंनी भुजबळ यांचे कौतुक केले आहे. यावेळी दोघांमध्ये मराठा आणि ओबिसी आरक्षणावर चर्चा झाली, असे संभाजीराजेंनी सांगितले आहे.
खासदार संभाजी छत्रपती हे आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजू शकलरा नाही. मात्र भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. शाहू महाराजांचे आणि नाशिककरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शाहू महाराज नाशिकला आले होते. तेव्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाला त्यांनी मदत केली होती. पिंपळगाव बसवंत येथे गणपतराव मोरेंना त्यांनी ताकद दिली होती. 6 मे रोजी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी आहे. त्यानिमित्ताने शाहू महाराजांचे विचार जगभर पोहोचवण्यावर आमची चर्चा झाली, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. शाहू महाराजांनी 1902 मध्ये पहिल्यांदा आरक्षण दिले होते. आता संपूर्ण बहुजन समाजाला कसे एकत्र आणता येईल. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे म्हणत बहुजन समाजाची वज्रमुठ खासदार संभाजीराजे बांधत आहे? असा सवाल राजकीय वर्तुळात अनेकांना पडलाय.
भाजप आणि संभाजीराजेमध्ये दरी
खासदार संभाजीराजे यांच्यात आणि भाजपमध्ये मोठी दरी पाहायला मिळते आहे. मराठा आरक्षणासाठी खासदारकी सोडायला तयार आहे. असे वक्तव्य खावसदार संभाजीराजे यांनी केले होते. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट नाकाल्याचे वृत्त देखील मागे चर्चेत होते. यामुळे संभाजीराजे भाजवर नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्या. आणि तेव्हापासून संभाजीराजे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीशी चांगले सुत जमले आहे. या आधी संजय राऊतांच्या दिल्लीतील निवासस्थानी संभाजीराजेंनी त्यांची भेट घेतली होती. यामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण दिसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.