आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक आणि सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या प्रश्नांसंदर्भात बुधवारी (दि. ७) मंत्रालयात बैठक घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज मंत्रालयात यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींबाबतची बैठक दुपारी ३ वाजता परिषद सभागृह २, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई येथे होणार असून सिन्नर औद्योगिक क्षेत्रासाठीची बैठक येथेच दुपारी ४ वाजता स्वतंत्र होणार आहे.मंत्रालयात हाेणाऱ्या या बैठकीतून उद्योगांसाठी अन्यायकारक ११ पट वाढलेली घरपट्टी तसेच दुहेरी फायर सेसची वसुली हे प्रमुख मुद्दे असू शकतील. सिन्नर औद्योगिक वसाहतीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सहकारी औद्योगिक वसाहतींचे पाच टक्के योगदान आणि शासनाने ९५ टक्के योगदान अदा करण्याचा महत्त्वपूर्ण विषय आणि सेझमधील १३०० एकर जागेवर उद्योग उभारण्यासाठी पीएपीतून भूखंड मिळालेल्यांना, जलवाहिनीची व्यवस्था हे प्रमुख विषय असू शकतील.
नाशिमधील उद्याेगांपुढील समस्या व प्रश्न स्थानिक पातळीवर साेडविण्यासाठी झूमची बैठक महत्त्वपूर्ण असते. मात्र ही बैठक वारंवार रद्द हाेत असल्याने याबाबत उद्याेजकांची तक्रार आहे. उद्याेगमंत्री नाशिक दाैऱ्यावर आले असता त्यांच्याकडे ही बाब मांडण्यात आली हाेती. त्यावर राज्यभरात अशी बैठक दर महिन्याला आयाेजित करण्याचे निर्देश देण्यात आले हाेते. आज मंत्रालयात हाेणाऱ्या या बैठकीत काय निर्णय हाेतात याकडे उद्याेजकांचे लक्ष आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.