आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:उद्योगांच्या प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक आणि सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या प्रश्नांसंदर्भात बुधवारी (दि. ७) मंत्रालयात बैठक घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज मंत्रालयात यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.सातपूर आणि अंबड या औद्योगिक क्षेत्रांची बैठक दुपारी ३ वाजता परिषद सभागृह २, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई येथे होणार असून सिन्नर औद्योगिक क्षेत्रासाठीची बैठक येथेच दुपारी ४ वाजता स्वतंत्र होणार आहे.

या बैठकीतून उद्योगांसाठी अन्यायकारक ११ पट वाढलेली घरपट्टी तसेच दुहेरी फायर सेसची वसुली हे प्रमुख मुद्दे असू शकतील. सिन्नर औद्योगिक वसाहतीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सहकारी औद्योगिक वसाहतींचे पाच टक्के योगदान आणि शासनाने ९५ टक्के योगदान अदा करण्याचा महत्त्वपूर्ण विषय आणि सेझमधील १३०० एकर जागेवर उद्योग उभारण्यासाठी पीएपीतून भूखंड मिळालेल्यांना, जलवाहिनीची व्यवस्था हे प्रमुख विषय असू शकतील.

उद्योग केंद्राच्या कामावर संताप व्यक्त होण्याची शक्यता
जिल्हा उद्योग केंद्राच्या कामकाजावर या बैठकीत देखील उद्योजक संघटनांकडून ताशेरे ओढले जाण्याची दाट शक्यता आहे. शासनाच्या विविध अनुदानाच्या योजनांबाबतची मंजूर मात्र प्रलंबित प्रकरणे त्याचबरोबर तीन वर्षे उद्योगांच्या प्रश्न सोडवण्यासाठी बोलावण्यात न आलेली तुमची बैठक. वारंवार मागणी केल्यानंतर थेट पालकमंत्र्यांना साकडे घातल्यानंतर आयोजित करण्यात आलेली आणि दोन वेळा स्थगित झालेली ही बैठक यामुळे उद्योजकांसोबत प्रशासन गंभीर नसल्याचा संताप उद्योजकांनी काल व्यक्त केला होता तोच या बैठकीत देखील दिसण्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...