आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीची बैठक नुकतीच आयटक कामगार केंद्र येथे झाली. बैठकीत शाहू महाराज स्मृती शताब्दीच्या वतीने विविध उपक्रम वर्षभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ जून रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सीबीएस, नाशिक येथे अभिवादन करून जयंती साजरी करण्यात येणार आहे. २७ जून सायंकाळी ५.३० वाजता डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
कार्यकारिणीत अध्यक्षपदी राजू देसले, सरचिटणीसपदी जयवंत खडताळे, उपाध्यक्षपदी अॅड. प्रकाश काळे, अॅड. नाझीम काजी, प्रफुल्ल वाघ, सहसचिव डॉ. अनिल आठवले, खजिनदार प्रभाकर धात्रक यांचा समावेश आहे. सदस्यपदी व्ही. टी. जाधव, करुणासागर पगारे, प्रा. एस. के. शिंदे चंद्रकांत गायकवाड, प्रल्हाद मिस्त्री, वसंत एकबोटे, सोमनाथ मुठाळ, संजय करंजकर, निशिकांत पगारे, विजय राऊत, अॅड. समीर शिंदे, अॅड. तातेराव जाधव, शिवदास म्हसदे, विजय राऊत, निशिकांत पगारे, कुणाल गायकवाड, अरुण घोडेराव, तल्हा शेख, महादेव खुडे यांचा समावेश आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. प्रकाश काळे होते. प्रभाकर धात्रक यांनी आभार मानले. पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थितहोते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.