आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील विविध विमानतळांचे प्रश्न मार्गी लागणार:महाराष्ट्र चेंबर बरोबर दिल्लीत होणार बैठक; केंद्रीय विमानवाहतूक मंत्र्यांचे आश्वासन

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील विविध विमानतळांच्या प्रश्नांसबंधी महाराष्ट्र चेंबर बरोबर लवकरच दिल्लीत बैठक होणार आहे. अशी ग्वाही केंद्रीय विमानवाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिली.

गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ज्योतिरादित्य सिंधीया यांची त्यांच्या कोल्हापूर दौर्‍यात भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या प्रश्‍नांसंबंधी निवेदन देऊन चर्चा केली त्या प्रसंगी ते बोलत होते.

विशेषतः नाशिक येथुन नवीन मार्गावर विमानसेवा सुरू करणे, जळगाव विमानसेवा सुरू करणे, औरंगाबाद पूणे हवाई सेवा, कोल्हापूर येथुन नवीन विमानसेवा मार्ग, अकोला, रत्नागिरी, चिपी विमानतळाबाबतही चर्चा करण्यात आली. शिर्डी विमानतळावरून कृषी उत्पादनांची वाहतुक वाढविण्यासाठी विशेष व्यवस्था, सर्व विमानतळावर कार्गो टर्मिनलची उभारणी या मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या.

सोलापूर विमानतळावरून नियमित प्रवासी सेवा सुरू करण्यासंबंधी असलेल्या अडचणी दुर करण्याची मागणीही ललित गांधी यांनी केली. तसेच यासाठी सोलापूर विकास मंच तर्फे गेले दिवस सुरू असलेल्या चक्री उपोषणाची माहीती देऊन या प्रश्‍नी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी ललित गांधी यांनी केली.

केंद्रीय मंत्री नाम. ज्योतिरादित्य सिंधीया या संदर्भात नवी दिल्ली येथे चेंबरच्या पदाधिकार्‍यांसमवेत लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे सांगितले. यावेळी खासदार धनंजय महाडीक, समरजित घाटगे, सतीश माने, प्रकाश केसरकर, दर्शन गांधी आदी उपस्थित होते.

नाशिकमध्ये अलायन्स एअरची विमानसेवा बंद झाल्याने नाशिककरांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. अलायन्स पाठोपाठ स्टार यांनी देखील सेवा बंद केली यामुळे या संतापात अजूनच भर पडली होती. नियमित 80% पर्यंत प्रवासी असताना देखील विमान कंपन्यांनी या सेवा बंद केल्या यात अलायन्सने उडान योजनेची मुदत संपल्याचे कारण दिले दुसरीकडे मात्र स्टार एयरची उडान योजनेची मुदत बाकी असताना देखील सेवा बंद झाली यामुळे प्रश्न उपस्थित केले जात होते. दोनच दिवसांपूर्वी माझी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश येऊन अलायन्स यांनी जानेवारी महिन्यापासून पुरवत सेवा सुरू करण्यासाठी तिकीट बुकिंग सुरू केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबरने उचललेले पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...