आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ समतावादी विचारवंत, संघर्षशील शेतकरी नेते, व्यासंगी पत्रकार चंद्रकांत वानखडे यांची १७ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ४ व ५ फेब्रुवारी रोजी वर्धा येथे हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला समांतर असे हे संमेलन होणार असल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, सेक्रेटरी, यशवंत मकरंद, संघटक किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे, मुख्य संयोजक डॉ.अशोक चोपडे यांनी सांगितले.
चंद्रकांत वानखडे हे समकालीन मराठीतील जीवन व लेखन यात द्वैत न मानणारे महत्वपूर्ण लेखक आहेत. शेतकरी आत्महत्या संदर्भातील त्यांचे लेखन १९८६ च्या साहेबराव करपेंच्या पहिल्या आत्महत्येपासून महाराष्ट्राने पाहिले आहे. ‘असे छळले राज बंद्याना’, ‘एक साध्या सत्यासाठी’ या आपल्या पुस्तकांसाठी ते ओळखले जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.