आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Members Of A Family In Nashik Called Off A Function To Solemnise Their 28 Year Old Daughter’s Wedding To A Muslim Man As Per Hindu Rituals; News And Live Updates

धर्मांधांमुळे लग्न रद्द:कुटुंबियांच्या मर्जीने नाशकात हिंदू मुलीचे मुस्लिम मुलासोबत होणार होते लग्न, धर्मांधांनी इतका दबाव टाकला की रद्द करावे लागले

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही परिवार एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखतात

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येतील दोन वेगवेगळ्या धर्मातील युवक व युवतींना लग्न करायचे होते. हे लग्न दोन्ही परिवारांना मान्य असून त्यासाठी त्यांनी लग्नाचे कार्डदेखील छापले होते. परंतु धर्मातील काही ठेकेदारांना ही बाब मान्य नव्हती. त्यांनी या लग्नाला लव्ह जिहादचे रंग देत हे कार्ड सगळीकडे व्हायरल केले. त्यामुळे दोन्ही परिवारांना मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. म्हणून त्यांनी हा लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही परिवार युवक-युवती सोबत
युवतीचे वडील प्रसाद आडगावकर हे सोन्या-चांदीचे व्यापारी आहेत. प्रसाद अडगावकर यांनी सांगितले की, दोन्ही परिवाराच्या स्वखुशीने आणि उपस्थित युवक युवतीने नाशिक न्यायालयातील कोर्टात रजिस्टर पद्धतीने लग्न केले आहे. परंतु दोन्ही परिवारांना पारंपारिक पद्धतीने लग्न करायचे असल्यामुळे त्यांनी 18 जुलै रोजी लग्न करणार होते. यासाठी नाशिक येथील एक मोठे हॉटेल बुक करण्यात आले असून सगळी तयारी झाली होती. हे लग्न स्वखुषीने असून जबरदस्तीने नसल्याचे युवतीचे वडील प्रसाद आडगावकर यांनी सांगितले. त्यासोबतच आमचे दोन्ही परिवार युवक-युवती सोबत खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

दोन्ही परिवार एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखतात
आडगावकर पुढे म्हणाले की, रसिका ही अपंग असल्यामुळे तिला मुलगा शोधण्यासाठी मोठी अडचण होत होती. परंतु नुकतेच रसिका आणि त्याचा सोबत शिक्षण घेणारा त्यांचा मित्र आसिफ खान याने स्वखुषीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही परिवार एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत असून त्यामुळे त्यांनी लग्नास होकार दिला असे आडगावकर म्हणाले.

लग्नाचे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल
प्रसाद आडगावकर यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता काही मोजक्याच लोकांना लग्नात आमंत्रित करण्याचा विचार होता. पण त्यापूर्वीच हे कार्ड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यानंतर दोन्ही परिवारांना धमकी देणारे कॉल्स आणि मेसेजेस या लागले. 9 जुलै रोजी काही लोकांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले तुला आणि हे लग्न रद्द करा असे सांगितले होते.

पीडित परिवारने कोणतीच तक्रार दिली नाही
संबंधित प्रकरणात पीडित परिवारावर खूप मोठे मानसिक ताण आलेले होते. पण तेवढं सारं होऊनही पीडित परिवाराने कोणाच्याही विरोधात तक्रार दाखल केली नाही. नाशिकमधील सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष असणाऱ्या सुनील महाळकर म्हणाले की, लग्नाचे हे पत्र आम्हालादेखील मिळाले होते. परंतु, याबाबीमुळे दोन्ही परिवाराने तात्पुरता हा सोहळा रद्द करण्याचे ठरवले असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...