आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांना मिळणार दर्जेदार सेवा:नाशिक जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय यांच्यात वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागास सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय निःशुल्क वापरास उपलब्ध करून देण्याबाबत नुकताच सामंजस्य करार झाला.

नवीन पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेकरीता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानंकनाप्रमाणे आवश्यक असलेले सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालय निशुल्क वापरासाठी उलब्ध करुन देण्यात आले आहे. हा करार कुलगुरू अधिष्ठाता मेजर जनरल सुशीलकुमार झा आणि जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक थोरात यांच्या स्वाक्षरीने संपन्न झाला. प्रती कुलगुरु डाॅ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डाॅ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डाॅ अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, उपकुलसचिव डाॅ. सुनील फुगारे, सह जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. उत्कर्ष दुधाडिया, यांच्यासह जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विज्ञानपीठाचे प्राध्यापक उपस्थित होते.

भविष्यात एम्स म्हणून...

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षक व संशोधन संस्था आरोग्य विद्यापीठाला संलग्न असलेली भारतातील एकमेव संस्था असून, जिल्हा रुग्णालय व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेसाठी आरोग्य शिक्षण व आरोग्य सेवा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध होतील. भविष्यात एम्स संस्थेसाठी दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून नावरुपास येणार असल्याचे कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...