आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदेशातील वातवरणात जलतरण, सायकलिंग व धावणे अशी सलग २२६ किलोमीटरची खडतर स्पर्धा जिंकण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तयारी खूप महत्त्वाची आहे, असे मत तब्बल दोनदा विजेत्या ठरलेले युवा उद्योजक महेंद्र छोरिया यांच्यासह नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणाऱ्या आयर्न मॅन योगाचार्य किशोर घुमरे यांच्यासह डॉ. अरुण गचाळे यांनी व्यक्त केले.
गंगाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत स्वर्गीय अशोकराव देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना तिन्ही आयर्न मॅननी आपला अनुभव कथन केला. ही स्पर्धा कसोटी पाहणारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुरेखा बोऱ्हाडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
पूर्णपणे शाकाहारी असलेल्या महेंद्र छोरिया यांनी आपला अनुभव कथन करताना अनेक शारीरिक अडचणींवर मात करत वयाच्या ३७ व्या वर्षी या स्पर्धेची तयारी सुरू केल्याचे सांगितले. योग्य व्यायाम, नियमित शाकाहारी आहार यावर आयर्न मॅन झाल्याचे त्यांनी सांगितले. बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. अरुण गचाले यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्यापासून या स्पर्धेची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. स्पर्धेच्या काळात आहारात बाजरी, ज्वारी, सिझनल फूड्स, उकडलेली अंडी घेतल्याचे सांगितले.
योगाचार्य किशोर घुमरे यांनी स्पर्धेतील यशाबाबत सुरवातीला साशंक असल्याचे सांगितले. परंतु नियमित मेडिटेशन, स्वतःशीच सुसंवाद यातून हे यश मिळाल्याचे सांगितले. स्पर्धा जिंकण्यासाठी दररोज तीन ते चार तास सराव महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.