आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुठल्याही क्रीडा प्रकारात मानसिक कणखरता अत्यंत महत्वाची असते. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही कुठलेही यश मिळवू शकता. यासाठी मुलांसोबत पालकांनी सुद्धा पेशन्स ठेवणे अत्यंत गरजेचे असून आशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन म्हणजे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्यासाठी युवा खेळाडूंना ही उत्तम संधी असल्याचे प्रतिपादन रणजीपटू खेळाडू सत्यजीत बच्छाव यांनी केले.
एनएसएन क्रिकेट ऍकॅडमी तर्फे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे मैदानावर कै.भाई वडके चषक -2022' अंडर-12 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन रणजीपटू सत्यजित बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैदानावर उपस्थित नाशिक जिल्हा क्रीडा विभागाचे अधिकारी अरविंद चौधरी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले व अशा स्पर्धांमधून क्रीडा संस्कृती अधिक भक्कम होईल असे सांगितले.
प्रत्येकी 25-25 षटकांचे सामने 8 दिवस साखळी पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाणार असून नाशिक मधील प्रमुख 8 संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहे. विजेत्या संघास 3000 रोख आणि द्वितीय संघास 2500 रोख पारितोषिक असून स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात सामनावीर, मालिका वीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज असे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी समिती तयार करण्यात आली असून. त्यात नियोजनासाठी एन.एस.एन क्रिकेट ऍकॅडमी संघाचे प्रशिक्षक मंगेश निर्भवने, शंतनू वेखंडे,यातेंद्र कार्लेकर,रितेश तिडके समितीचे कामकाज बघत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.