आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संस्कृतीचे जतन करून देशसेवेसाठी योगदान द्यावे असे आवाहन प्रबोधनकार प्रशांत कोतकर यांनी लाडशाखीय वाणी मित्र मंडळाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्या प्रसंगी केले.
जेव्हा जेव्हा जगावर संकट आले तेव्हा विश्वाला भारताची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भारतीय संस्कृतीची फार मोठी परंपरा आहे. आपली संस्कृती व्यापक आहे. संपुर्ण जगात भारताची ताकद आज दिसून येत आहे. आपली धर्म, संस्कृती जपण्याचे काम सर्वांनी करणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृती , परंपरा जपण्यासाठी आपले सामर्थ्य ओळखणे आवश्यक आहे.
'भारत भाग्यविधाता ,विश्व गुरू निर्माता ' या विषयावर त्यांनी प्रबोधन केले. यावेळी व्यासपीठावर नाशिक रोड वाणी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत शिरोडे, नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, विनोद दशपुते, वास्तुविशारद चंद्रकांत धामणे , सन्मित्र मंडळाचे गिरीश महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत होते. मंडळाला 12 वर्षे पुर्ण झाले असून 'आझादी का अमृत महोत्सव 'या थीम वर हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत शिरोडे यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गणेश वंदना, देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. माजी सैनिकांचा सत्कार, वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करून ज्युनिअर के.जी. ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अशा एकूण 150 मुलांचा व मुलींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे सल्लागार आर. एल .वाणी, नंदकुमार मेतकर, दीपक कोठावदे,पदाधिकारी जितेंद्र कोठावदे, निलेश दशपुते, उमाकांत वाकलकर , संजय राणे , एस. एम. अमृतकर ,संचालक रामदास बधान, कृष्णा वाणी बाबासाहेब मुसळे , कुंदन वाणी, शशिकांत अमृतकर ,प्रवीण वाणी, भूषण धामणे, निमंत्रित सदस्य दीपक नागमोती, मनोज येवले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यशवंत कोठावदे यांनी केली.नाशिक रोड येथील माहेश्वरी भवन येथे हा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.