आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बायो फर्टिलायझर’ प्रकल्पाचा ‘आविष्कार’:मेट इन्स्टिट्यूट ऑफ डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांची धुळे येथे झोनल लेव्हल ‘आविष्कार’ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नाशिकच्या मेट इन्स्टिट्यूट ऑफ डी. फार्मसीमधील साहिल काकुस्ते आणि आदिती खैरनार या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘बायो फर्टिलायझर फॉर्म्युलेशन फॉर पोटॅशियम बूस्टिंग’ या प्रकल्पास द्वितीय क्रमांक मिळाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अंतर्गत आविष्कार स्पर्धा राबविण्यात येते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी मेट डी. फार्मसी कॅम्पसमध्ये पार पडली. झोनल लेव्हल राउंंड हा धुळे येथील बापूसाहेब देवरे कॉलेज येथे शनिवारी पार पडला. या स्पर्धेत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील बाटू विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचा समावेश होता.

प्रकल्पातून पीक वाढीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी संशोधन करत बायो फर्टिलायझरचा प्रकल्प तयार केला. हा प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून शेती पिकांच्या वाढीसाठी बायो फर्टिलायझरची निर्मिती आणि त्याचा वापर कसा होतो, हे या प्रकल्पातून समजते.

बातम्या आणखी आहेत...