आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखगोल-आकाशप्रेमींना वर्षातल्या पहिल्या क्वाड्रांटिड उल्कावर्षाव (मीटिओर शॉवर) साेमवार(दि. ३)च्या रात्री आणि मंगळवारी (दि. ४) पहाटे पाहता येणार असल्याचा दावा खगोल अभ्यासक सुदर्शन ओमप्रकाश गुप्ता यांनी केला आहे.
गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात क्वाड्रांटिड सक्रिय असतात. ४ जानेवारीला पहाटे २ ते ४ या दरम्यान उल्कापात शिखरांवर राहील. उल्कांचे प्रमाण ताशी १५० ते २०० इतके राहणार असल्याचे अमेरिकेच्या ‘नासा' या संस्थेने सुचवले आहे. उल्कावर्षाव ही निसर्गाची एक विलोभनीय देणगी आहे.
उल्कावर्षाव हा धूमकेतूमुळे दिसतो. जेव्हा धूमकेतू सूर्यप्रदक्षिणा करून जातो, तेव्हा तो आपल्या मागे वायू आणि धूळ सोडत जातो. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना या धुळीच्या मार्गातून जाते तेव्हा ही धूळ (खडक, धातू, वायू, बर्फ) पृथ्वीच्या गुरुत्वामुळे आकर्षित होऊन जमिनीकडे खेचली जाते. क्वाड्रांटिड उल्कावर्षावाचा स्रोत हा २००३ ए १ नावाचा लघुग्रह आहे. २ ते ४ जानेवारीला रात्री त्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. लघुग्रहाचे कण हे धूमकेतूच्या शेपटीतील धूलिकणांपेक्षा आकाराने मोठे असल्यामुळे या उल्का अधिक तेजस्वी दिसतात.
खगाेलप्रेमींसांठी चांगली संधी
सोमवार (दि.३) रात्री होणारा हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी निरीक्षण करता येईल. २ जानेवारीला पौष अमावस्या असल्याने चंद्रप्रकाशाचा अडथळा नसणार, ही खगोलप्रेमींसाठी आणि हौशी नवीन दर्शकांसाठी चांगली संधी असेल. पाठीवर झोपून किंवा आरामखुर्चीवरून पाहणे सोयीचे आहे. उल्का निरीक्षण उंच इमारतीवर जिथून चारही दिशेने क्षितिज दिसेल अशा ठिकाणाहून करावे. - सुदर्शन गुप्ता, खगोल अभ्यासक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.