आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:मेटघरच्या वाड्या-वस्त्यांना आठ दिवसांत मिळणार नळाद्वारे पाणी, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी, ग्रामस्थांशी चर्चा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक जिल्ह्यातील मेटघर येथील पाणीटंचाइचे वृत्त दिव्य मराठीने ५ एप्रिलच्या अंकात दिले. - Divya Marathi
नाशिक जिल्ह्यातील मेटघर येथील पाणीटंचाइचे वृत्त दिव्य मराठीने ५ एप्रिलच्या अंकात दिले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर येथील सहा वाड्या-वस्त्यांसाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत येत्या आठवडाभरात तेथील नागरिकांना थेट नळाद्वारे पाणी मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसाेड यांनी दिली.

महादरवाजा मेट पाड्यावर ‘पाण्याच्या एका हंड्यासाठी ३५ फूट खोल विहिरीमध्ये उतरण्याची वेळ’ याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता पी.सी. भांडारकर आदींनी मंगळवारी महादरवाजा परिसराला भेट देऊन पाहणी केली. या वेळी ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह ग्रामस्थही उपस्थित होते. मेटघर येथील विहिरीतील पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याबाबतची तपासणी केली जाईल. तात्पुरत्या स्वरूपात तीन तर कायमस्वरूपी आठ दिवसांत पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...