आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड औद्योगिक वसाहतीत लागू असलेल्या दुहेरी फायरसेसच्या मुद्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरसुद्धा एमआयडीसीने सेसच्या वसुलीबाबतच्या नोटिसा अंबडच्या उद्योजकांना पाठविल्या आहेत. त्यात संदिग्धता असल्याने त्यावरून निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली निमा आणि आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यासंदर्भात एमआयडीसी स्पष्ट खुलासा करत नाही तोपर्यंत उद्योजक फायरसेस व त्याची थकबाकी भरणार नाहीत, असा इशारा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिला. अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी आणि महापालिका या दोन्ही संस्थांतर्फे फायरसेस वसूल केला जातो.
यासंदर्भात उद्योजकांनी सातत्याने आवाज उठविल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत डिसेंबरमध्ये सर्व यंत्रणांच्या झालेल्या बैठकीत याबाबत मुद्देसूद चर्चा होऊन एमआयडीसीने अंबड येथील फायर स्टेशन १ एप्रिल २०२३ पासून महापालिकेकडे हस्तांतरित करावे अशी मागणी उद्योजकांनी लावून धरली असता मंत्रीमहाेदयांनी त्याबाबत हस्तांतरणाचे स्पष्ट निर्देश दिलेले होते. एमआयडीसीने हे फायर स्टेशन महापालिकेकडे हस्तांतरित करावे व त्याच्या इस्टॅब्लिशमेंटच्या पैशांबाबतचा प्रस्ताव मांडून महापालिकेकडून ती रक्कम घ्यावी तसेच एक एप्रिलपासून एमआयडीसीने कोणताही फायरसेस वसूल करू नये असे स्पष्ट निर्देश मंत्रीमहोदयांनी दिले होते. परंतु असे असतानाही त्या निर्देशाला बगल देत एमआयडीसीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अंबडच्या उद्योजकांना ३१ मार्चपर्यंतच्या फायरसेसच्या वसुलीच्या नोटिसा पाठविल्या. मात्र १ एप्रिलपासून एमआयडीसी फायरसेसची वसुली करणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.